Desh

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

By PCB Author

October 25, 2018

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी काँग्रेस नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री  अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधात आज (गुरुवारी) अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) पटियाला हाऊस न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.  या प्रकरणात एकूण ९ जणांची नावे आरोपी म्हणून घेतली आहेत.  या आरोपपत्रावर २६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

या प्रकरणात कार्ती चिंदंबरम यांना जाणूनबुजून अडकवण्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. ईडी सरकारच्या ताब्यात आहे, आणि जो कोणी सरकारविरोधात बोलेन त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते हरीश रावत यांनी केला आहे.

दरम्यान, कार्ती चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस व्यवहारानुसार विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाची मंजुरी मिळाल्या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. त्यावेळी पी चिदंबरम अर्थमंत्री होते. चिदंबरम यांनी या प्रकरणात एफडीआयच्या शिफारशीसाठी आर्थिक प्रकरणांच्या कॅबिनेट समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता.