एअरटेल कंपनीची 200 मीटर इंटरनेट फायबर केबल चोरीला

0
352

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – एअरटेल कंपनीची 200 मीटर इंटरनेट फायबर आणि जॉईंट क्लोजर दोन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सहा जुलै रोजी इंडियन ऑईल पेट्रोल पंप कासारवाडी येथे आणि 13 जुलै रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे घडली.

प्रतिक सोपान लोंढे (वय 28, रा. कासारवाडी), अविनाश धर्मराज कटके (वय 28, रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत राहुल दिलीप सणस (वय 36, रा. कोथरूड) यांनी गुरुवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एअरटेल (टेलीसाॅनिक नेटवर्क लिमिटेड) या कंपनीत काम करतात. सहा जुलै रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंप कासारवाडी येथे आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीची 200 मीटर इंटरनेट फायबर आणि जॉईंट क्लोजर असा एकूण बत्तीस हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच 13 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फुगेवाडी मेट्रो स्टेशन जवळ एअरटेल कंपनीचे इंटरनेट सायबर कट करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.