उसाच्या ट्रॅक्टरला मारला कट आणि…

0
256

पिंपरी, दि.29 (पीसीबी) : एका टेम्पोने उसाच्या ट्रॅक्टरला कट मारला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागून जाणा-या दुचाकीस्वाराने टेम्पो चालकाला कट मारल्याबाबत जाब विचारला. यावरून टेम्पो चालक आणि त्याच्या एका साथीदाराने जाब विचारणा-यास आणि त्याच्या मित्राला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 28) सायंकाळी पावणे सात वाजता खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली.

रामदास संभाजी चौधरी (वय 32, रा. गोलेगाव, ता. खेड), दीपक साळवे अशी जखमींची नावे आहेत. चौधरी यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो (एम एच 12 / एफ सी 7592) चालक आणि त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी त्यांच्या दुचाकीवरून मित्र दीपक साळवे याच्या सोबत जात होते. मरकळ येथे गोलेगाव ते सोळ खिंड रोडने जात असताना चौधरी यांच्या समोरून एक उसाचा ट्रॅक्टर जात होता. आरोपी टेम्पो चालकाने समोरच्या बाजूने येऊन ट्रॅक्टरला कट मारला. त्यामुळे चौधरी यांनी टेम्पो चालकाला ‘हळू चालव, तुझ्यामुळे कोणाचा जीव जाईल’ असे म्हटले. त्यावरून टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी चौधरी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.