“उर्मिला देखील सॉफ्टपॉर्न स्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही”

0
204

मुंबई, दि.१७(पीसीबी) : शिवसेना आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद काही नवीन नाही. मत कंगना तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला ती उटलून प्रतिक्रिया देत आहे. अशातच तिने आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला उलट उत्तर देताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे.

कंगना म्हणाली कि, “माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?”

उर्मिला मातोंडकर यांनी एका मुलाखतीत कंगणाला वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून आणि मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंगणाला फटकारलं होतं. मात्र आता कंगणाने केलेल्या टीकेमुळे तिच्यावरच टीका केली जात आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.