उरी द सर्जिकल स्ट्राइकचा अभिनेता विकी कौशल साकारणार ‘अश्वत्थामा’

0
457

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ च्या यशानंतर आता अभिनेता विकी कौशल कोणत्या भूमिकेत दिसणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. विकी कौशल आता चक्क महाभारतातील एक पात्र पडद्यावर साकारणार आहे. महाभारतातील दुर्लक्षित पण तितकीच गूढ व्यक्तिरेखा म्हणजे ‘अश्वत्थामा’ . विकी त्याच्या आगामी चित्रपटात ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत दिसणार आहे.