उभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकणार नाही – नितीन गडकरी

0
426

मुंबई, दि, १६ (पीसीबी) – टोलमुक्तीचा नारा देत भाजपा सरकारने केंद्रात सरकार स्थापन केले आणि दुसरीकडे खासदार व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभेत आज टोलमुक्ती होणे शक्य नाही. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे त्यांनी सांगितले आहे.

देशातील ज्या भागात टोल देण्याची क्षमता आहे, त्याच भागातून टोल वसूली केली जाते. टोल वसूलीतून ग्रामाणी भागातील व डोंगराळ भागातील रस्ते बांधले जातत. लोकसभेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले. तसेच सरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात ४० हजार किमींचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष्यात बंद होऊ शकणार नाही, मात्र, गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

दुसरीकडे भाजपचे सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी’ भाजपचे ओळखपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. कारण आयकार्डवर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे,’ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेत्यानंच ही सणसणीत चपराक आहे.