Pimpri

उबेर चालकाला मारहाण करून कार पळवली

By PCB Author

October 14, 2020

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : उबेर चालकाला बेदम मारहाण करून तीन जणांनी मिळून कार पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री साडेअकरा वाजता किवळे ब्रिजजवळ देहूरोड येथे घडली.

महारुद्र चोबे (वय 26, रा. काटेपूरम चौक, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चोबे उबेर ऑनलाईन कार सर्विसच्या माध्यमातून कार चालवतात. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांना उबेरचे किवळे ब्रिजजवळ ऑनलाईन लोकेशन आले. तिथून प्रवासी ग्राहकाला घेण्यासाठी चोबे त्यांची कार (एम एच 14 / ए जी 5831) घेऊन गेले.

तिथे त्यांना तीन इसमांनी हात करून थांबवले. चोबे यांना कार मधून जबरदस्तीने खाली ओढले. कारची चावी घेतली आणि चोबे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चोबे यांची 5 लाख 11 हजार 500 रुपयांची कार घेऊन आरोपी पळून गेले. याबाबत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.