उपवासाचा खास पदार्थ: रताळ्याचे खमंग गुलाबजाम नक्की करून पहा…

0
837

मुंबई, दि १८ (पीसीबी) – साहित्य- चार रताळी, साखार दीड वाटी, तळण्यासाठी तूप शिंगाजे पीठ २ चमचे, साबुदाणा पीठ १ चमचा, वेलची पूड

कृती- रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे, कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे.