उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची बाधा

0
283

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) –  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण झाली आहे. आज नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.  व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लक्षणं नाहीत तसेच त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे.

कोणतीही लक्षणं नसल्यानं नायडू यांना डॉक्टरांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतींच्या सचिवालयानं ट्विटरवरून व्यंकय्या नायडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील नितीन गडकरी यांच्यासह काही मंत्री कोरोनामुळे बाधित झाले. आता सर्वांची तब्बेत सुधारते आहे, पण सुरेश अंगडी हे मंत्री निधन पावले.