उपमुख्यमंत्री लहान पद; आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील – संजय राऊत

0
491

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या मागणीला पुष्टी देणारे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील, अशा घडामोडी सध्या सुरु आहेत,  असे सूचक विधान  राऊत यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील, अशा घडामोडी, जडणघडण सध्या सुरु आहे, असे सुचक विधान राऊत यांनी केले आहे.

लोकसभेचे उपाध्यक्षपद अजिबात मागितले नव्हते, असा दावा संजय राऊत यांनी केला. आम्ही त्या पदावर शिवसेनेचा नैसर्गिक अधिकार आहे, असे सांगितले होते, दावा केलेला नव्हता. एखाद्या गोष्टीची इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही. लोकसभेचे उपाध्यक्षपद कोणलाही देऊ देत, असेही ते यावेळी म्हणाले.