Banner News

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाग्रस्त

By PCB Author

October 26, 2020

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली होती. कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. दोनच दिवसांपूरर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांचा पहिल्यांदा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु पुन्हा एकदा ते पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याची माहिती आहे.