उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन

0
569

पुणे, दि.२५ (पीसीबी) – राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील (वय ५०) यांचे पुण्यात आज पहाटे निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे ते धाकटे बंधू होते. अमरसिंह गेली अनेक वर्षे पुण्यातच वास्तव्यास होते.

आज दुपारी त्यांच्या मूळ गावी तेर (जि. उस्मानाबाद) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.