उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूनुसार ‘या’ सुंदर ठिकाणी जा फिरायला!

0
740

मुंबई, दि.२ (पीसीबी) : नववर्षाला आनंददायी सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षात कोरोनामुळे बहुतेक लोक घरातच अडकून पडले आहेत. त्यामुळे 2021 या वर्षाकडे लोक खूप आशेने पाहत आहेत. यंदाच्या वर्षी सण, वींकडेसह, भरपूर सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुम्ही आरामात फिरण्याच्या योजना आखू शकता मात्र अनेकदा कोणत्या महिन्यात नेमकं कुठे फिरायला जावं, असा प्रश्न पडतो. अनेकदा सुट्टीचे प्लॅनिंग करता करता नाकी नऊ येतात. अनेकदा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूनुसार कुठे फिरायला जायचं असा प्रश्न विचारला जातो. तसेच जर तुमचे प्लॅनिंग चुकले तर तुमची पिकनिक पूर्णपणे फसू शकते.

जानेवारी
जानेवारी महिन्यात तीन वेळा लाँग विकेंड आहे. जानेवारी महिन्यात तुम्ही मकर संक्रात, प्रजासत्ताक दिन या सुट्ट्यांसोबत आणखी एक दिवस सुट्टी टाकून फिरायला जाऊ शकता. जानेवारी महिन्यात थंडीचे वातावरण असते. त्यामुळे तुम्ही शिमला, कुफरी, नारकंडा किंवा उत्तराखंड या बर्फाच्छादित ठिकाणी जाऊ शकता. त्याशिवाय तुम्ही जानेवारी जयपूरलाही जाऊ शकता. तसेच 14 जानेवारीला अनेक ठिकाणी पतंगोत्सवाचेही आयोजन केले जाते. त्याचाही तुम्ही आनंद लुटू शकता.
मार्च
यंदाच्या मार्च महिन्यात दोन वेळा लाँग विकेंड आहेत. विशेष म्हणजे या महिन्याअखेरीस होळी आली आहे. त्यादरम्यान तुम्हाला लाँग विकेंडची मज्जा घेता येऊ शकते. तसेच यंदा महाशिवरात्री गुरुवारी आहे. त्यामुळे जर तुम्ही शुक्रवारी एक दिवस सुट्टी घेऊन चार दिवस सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. मार्चमध्ये तुम्ही राजस्थानच्या उदयपूरला फिरायला जाऊ शकता. कारण या दरम्यान राजस्थानात जास्त थंड किंवा गरम असे दोन्ही वातावरण नसते. त्यामुळे राजस्थान फिरण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
एप्रिल
येत्या 2 एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने तुम्हाला सलग सुट्टी मिळेल. या दरम्यान तुम्ही कोणत्याही हिल स्टेशनला फिरायला जाऊ शकता. एप्रिल महिन्यात मकलोडगंज या ठिकाणी अनेक जण फिरायला जातात.
मे
मे महिन्यात 13 मे रोजी ईद आहे. यंदा ईद गुरुवारी असल्याने तुम्ही शुक्रवारी सुट्टी घेऊन लाँग विकेंड घेऊ शकता. मे महिन्यात फार उष्णता असते, जर तुम्ही 13 ते 16 मे अशी चार सुट्टी घेतलात. तर तुम्ही एखाद्या थंड ठिकाणी फिरायला जाऊ शकता. त्यामुळे या दरम्यान तुम्ही जिम कॉरबेट, मशरोबा, पार्वती वॅली या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला उन्हापासून थोडा काळ आरामही मिळू शकतो.
जुलै
जुलै महिन्यात 12 जुलैला सोमवारी रथ यात्रा आहे. तर 20 जुलैला बकरी ईद ईद आहे. या दोन्ही वेळी तुम्ही एक सुट्टी घेऊन लाँग विकेंडचा आनंद घेऊ शकता. त्यादरम्यान तुम्ही दक्षिण भारतात फिरायला जाऊ शकता. (Long Weekend 2021 Tourist Place List)
ऑगस्ट
ऑगस्ट महिन्यात 30 तारखेला जन्माष्टमी आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याच्या शेवटी लाँग विकेंड मिळू शकतो. जर तुम्हाला जन्माष्टमीचा आनंद घेण्याची इच्छा असेल, तर तुम्ही मथुरा, वृंदावन या ठिकाणी पिकनिकला जाऊ शकता.
सप्टेंबर
सप्टेंबर महिन्यात 10 ते 12 तारखेला लाँग वीकेंड आहे. जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात सुट्टी मिळाली तर तुम्ही जयपूर, आग्रा या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. तसेच तुम्ही या काळात दिल्ली-जयपूर-आग्रा या ठिकाणी पिकनिकला जाऊ शकता.
ऑक्टोबर
यंदा दसरा शुक्रवारी 15 ऑक्टोबरला येत आहे. त्यानंतर तुम्ही शनिवारी आणि रविवारी सुट्टी घेऊन तीन दिवस फिरायचे प्लॅनिंग करु शकता. ऑक्टोबर महिन्यात हलक्या थंडीला सुरुवात होते. त्यामुळे या दरम्यान तुम्ही राजस्थान, पंजाब या ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जाऊ शकता. तसेच तुम्ही मसूरीला फिरायला जाऊ शकता.
नोव्हेंबर
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे तुम्हाला लाँग विकेंडच्या अनेक संधी मिळतात. यादरम्यान अनेक जण फिरायला जातात. यावेळी तुम्ही पंजाब किंवा हिमाचल प्रदेश, मनाली या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.