उध्दव ठाकरे माझ्यासाठी लक्ष्मणरेषा – अर्जुन खोतकर

0
503

नाशिक, दि. २५ (पीसीबी) – युती झाल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याची तयारी  करत असलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कोंडी झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आहेत, असे खोतकर यांनी म्हटले आहे.  

खोतकर  एका विवाह सोहळ्यासाठी नाशिकला आले होते. यावेळी ते शासकीय विश्रामगृहावर  पत्रकारांशी बोलत होते.

खोतकर म्हणाले की,  दानवेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा  यापूर्वीच मी जाहीरपणे व्यक्त केली आहे. परंतु, मी शिवसैनिक आहे. त्यामुळे माझ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण आहे.  तरीही माझ्या भावना  त्यांना कळविणार आहे. याबाबत मुंबईत जाऊन मी चर्चा करणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी परिस्थिती माझ्यासाठी अनुकूल आहे, असे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.  मात्र, मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याप्रती बांधिल आहे, असे खोतकर म्हणाले.