उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या भिसीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीला ‘गुन्हे शाखा युनिट 5’ कडुन अटक

0
436

पिंपरी,दि.२२(पीसीबी) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री कृष्ण प्रकाश यांनी राबविलेल्या ‘Zero Tollarance’ मोहिमेअंतर्गत गुन्हयांना प्रतिबंध व्हावा, या अनुशंगाने श्री.बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट5 पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखा युनिट 5 कडील अधिकारी व कर्मचारी यांना आदेशीत करुन सुचना दिल्या होत्या. आदेशाप्रमाणे कारवाई करीत असताना गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व सावन राठोड यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, तळेगाव दाभाडे, देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोन्याची भिसीचे नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार झालेला आरोपी संजय मारुती कारले, हा त्याचे राहते घरी तळेगाव दाभाडे येथे येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरच्या बातमीचा आशय श्री.बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 यांना कळविला असता, त्यांनी गुन्हे शाखा युनिट 5 कडील पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर व श्यामसुंदर गुट्टे यांचे एक शोध पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

त्यावर सदरचे शोध पथक मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन दबा धरुन थांबलेले असताना एक इसम चालत येताना दिसले. त्यांना पोलीसांचा सुगावा लागताच तो पळ काढु लागला. त्यास शिताफिने पकडुन ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याला गुन्हे शाखा, युनिट 5 कार्यालय येथे आणुन त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचे नाव संजय मारुती कारले, वय 42 वर्षे धंदा व्यवसाय, रा अनिकेत अपार्टमेंट, फ्लॅट नं 05, यशवंतनगर तळेगाव दाभाडे पुणे असे असल्याचे सांगुन त्याने सोन्याचे भिसीचे नावाखाली देहुरोड व तळेगाव भागामध्ये लोकांची फसवणुक केली असल्याचे कबुल केले. पोलीस अभिलेख चेक केला असता त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे.

1. देहुरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. 495/2019 भादविक 420, 34
2. देहुरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. 616/2018 भादविक 420, 384, 34
3. देहुरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. 620/2018 भादविक 420, 384, 504, 506, 34 आर्म ऍ़क्ट          3(25)
4. तळेगाव दाभाडे गु.र.नं. 656/2019 भादविक 420 व मोका 3(1)(ii) 3(1)

आरोपी संजय मारुती कारले, वय 42 वर्षे धंदा व्यवसाय, रा अनिकेत अपार्टमेंट, फ्लॅट नं 05, यशवंतनगर तळेगाव दाभाडे पुणे यास पुढील तपासकामी देहुरोड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर,श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.