Chinchwad

उद्योगनगरीतील डेंगू, स्वाईनफ्ल्यू सारख्या आजारी रुग्णांवर वेळेत उपचार करण्याची मागणी

By PCB Author

September 25, 2018

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात डेंगू, स्वाईनफ्ल्यू सारखे आजार मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. तरी आपल्या वैद्यकीय विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना तातडीचे व  वेळेत उपचार द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र विद्युत समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी चिचंवड येथील तालेरा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी विनादेवी गंभीर यांना दिले.  

यावेळी भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे,  भारती विनोदे, मुकुंद गुरव, गणेश बच्चे, अभिजित पवार, सिद्धू लोणी, राजू कोरे, सौरभ कर्नावट, सुनील कुलकर्णी, गिरीश हंपे आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात डेंगू, स्वाईनफ्ल्यू सारखे आजार मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय, आजारावरील उपचारही महागडे असल्यामुळे कित्येक रुग्णांना उपचार वेळेत घेणे परवडत नाही. तसेच अश्या आजारांची माहिती व काळजी कशी घ्यावी याची अपुरी माहितीमुळे हे आजार आणखी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. तरी आपल्या वैद्यकीय विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना तातडीचे व  वेळेत उपचार द्यावे, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.