“उद्या मलाही ईडीची नोटीस येऊ शकते”

0
170

नवी मुंबई,दि.०५(पीसीबी) – भाजप सक्तवसुली संचलनालयाचा (ED) वापर करुन विरोधकांना लक्ष्य करत आहे. कदाचित उद्या मलाही ‘ईडी’ची नोटीस येऊ शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले.

ते मंगळवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ईडी’कडून राजकीय नेत्यांना पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांविषयी शंका उपस्थित केली. हा राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. तेव्हापासून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे.