Pimpri

उद्यान विभागाचे स्वच्छ अभियान की घाण अभियान? – यल्लपा वालदोर

By PCB Author

October 30, 2023

स्वच्छ अभियाना अंतर्गत संपूर्ण शहर साफ करता करता, पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभागाचे मात्र उड्डाण पुलावर ठेवलेल्या कुंड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे अशी टीका आपचे पदाधिकारी यल्लाप्पा वालदोर यांनी केली.

फुगेवाडी -दापोडी येथील उड्डाणपूलावर काही झाडे लावली होती मात्र आज रखरखत्या उन्हात ही सर्व झाडे वाळून जात असताना सुद्धा उद्यान विभागाचे याकडे लक्ष देत नाही आहे. झाडांना वेळेवर पाणी दिले जात नाही, वेळेवर खत घातले जात नाही, कुंड्यामधील कचरा साफ केला जात नाही. उद्यान विभाग जर ही झाडे जगवू शकत नाहीत, झाडांची निगा राखू शकत नाहीत, औषध फवारणी करू शकत नाही तर जनतेचा कररुपी पैसा वायफट का घालावत आहे असा त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भामध्ये निवेदन देऊन या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व झाडांची योग्य ती निगा राखावी अशी मागणी यल्लाप्पा वालदोर यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी ब्रम्हानंद जाधव, कमलेश रणावरे व सचिन पवार हे कार्यकर्ते सोबत होते.