उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगलं सांभाळतील – मनोहर जोशी

0
394

मुंबई,दि.१६(पीसीबी) – शिवसेनेचा मुख्यमंत्री नक्की होणार आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री कोण होईल याचं उत्तर देण्याची मी घाई करणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या घटनेकडे मी आनंदाने पाहतो. मुख्यमंत्रिपद सांभाळणं खूप अवघड असतं. मात्र, उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, असं माझं मत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

सर्वात जास्त मी उद्धव ठाकरेंसोबत राहिलो आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. ते मुख्यमंत्रिपद चांगलं सांभाळतील असा मला विश्वास आहे, असंही मनोहर जोशी म्हणाले आहेत. जोशी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.