Maharashtra

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस राजकारणातील बेस्ट कपल; धनंजय मुंडेंची ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त खिल्ली

By PCB Author

February 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील बेस्ट कपल आहेत, अशा शब्दांत या दोन नेत्यांची  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ट्विटरवरून  खिल्ली उडवली आहे.   

यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का? असे धनंजय मुंडे यांनी  त्यांच्या ट्विटर अकाउंटवर उपहासात्मकपणे म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये युतीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.  गेल्या साडेचार वर्षात उद्धव ठाकरे यांनी  भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. सत्तेतून बाहेर पडू, अशी अनेकदा धमक्याही दिल्या आहेत. तर दुसरीकडे  जाहीर सभांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी या दोघांवर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने निशाणा साधला आहे.