Maharashtra

उद्धव ठाकरेंनी घेतला स्वबळाचा आढावा; मात्र खासदारांचे तोंडावर बोट  

By PCB Author

October 07, 2018

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी आढावा बैठक बोलावली होती. यावेळी उद्धव यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शिवसेनेच्या उपस्थित खासदारांनी मौन बाळगल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.  

या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ शिंदे, आमदार दिवाकर रावते, आमदार रामदास कदम आणि चंद्रकांत खैरै, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने हे खासदार उपस्थित  होते.

यावेळी उध्दव यांनी खासदारांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला.  मात्र, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा स्वबळावर लढवण्याचा पुनरूच्चार केला. मात्र, यावर खासदार मौन बाळगून असल्याची माहिती मिळत  आहे. आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती असेल? असा सवालही उद्धव ठाकरेंनी खासदारांना यावेळी केला.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.  मात्र, स्वबळावर लढल्यास शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. एनडीएच्या जागा कमी होतीलच, मात्र, शिवसेनेला राज्यात अवघ्या दोन जागा मिळण्याचा अंदाज पाहणीतून समोर आला आहे.