Pune

उद्धवसाहेब तुम्ही परिस्थिती खूप चांगली हाताळताय पण…

By PCB Author

April 12, 2020

 

पुणे, दि.१२ ( पीसीबी) – कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने पसरत आहे. शासन आणि प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या थर्थीचे प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या संयमाने ही सगळी परिस्थिती हाताळत आहेत त्याचे पुण्यातले मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी कौतुक केले आहे. मात्र अन्नधान्य वाटप वितरणावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक खंत व्यक्त केली आहे.

वसंत मोरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,आम्ही नगरसेवक नागरिकांच्या अगदी दारात जाऊन काम करतो. तुम्ही टीव्हीवर सांगितलं की रेशन कार्डवर धान्य मोफत वाटणार आहे. मग सगळे बायाबापडे रेशन दुकान गाठतात. मग तो सांगतो की ज्यांची कार्ड अन्नसुरक्षाची आहेत त्यांनाच मिळेल. मग मोर्चा वळतो तो सगळे नगरसेवकाच्या घराकडे. खूप वाईट वाटतंय ओ पण मोफत धान्य वाटून आता आम्हीही घाईला आलो आहे. सरकारने यात आता काहीतरी लक्ष घालावे आणि नागरिकांना पोटा पाण्याविना मारू नये, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उद्धवसाहेब खरच तुम्ही खूप चांगली परिस्थिती हाताळताय पण आम्ही नगरसेवक नागरिकांच्या अगदी दारात काम करतो. त्या गरीब जनतेला काय माहित मंत्री काय करतो, आमदार काय करतो, खासदार काय करतो त्यांना सोपा असतो तो नगरसेवक. १/४ pic.twitter.com/BrACDwVWdP

— Vasant More (@vasantmore88) April 11, 2020