Maharashtra

उदयनराजे भोसले हे राजे आहेत, त्यांचा मी प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही – नरेंद्र पाटील

By PCB Author

October 29, 2018

पंढरपूर, दि. २९ (पीसीबी) – सातारा लोकसभेची जागा लढवण्याचा प्रश्नच येत नाही,’ साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार ‘उदयनराजे भोसले हे राजे आहेत. त्यामुळे मी त्यांचा प्रतिस्पर्धी नाही, असे स्पष्टीकरण  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले आहे.

उद्यनराजे यांच्याविरोधात नरेंद्र पाटील यांना रिंगणात उभे करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला पंढरपूरमध्ये बोलताना पाटील यांनी पूर्णविराम दिला. मी उद्यनराजे यांचा आदर करतो. मी एक साधा माथाडी कार्यकर्ता आहे. महामंडळाचे काम मला उत्तमपणे करायचे आहे. साताऱ्यातून निवडणूक  लढवण्याचा विषय माझ्यापुढे नाही, याबाबतच्या होणाऱ्या चर्चा निराधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  सातारा लोकसभा मतदारसंघातून  भाजपने उदयनराजे भोसले यांच्या विरोधात ताकदीच्या उमेदवाराचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.  तसा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांचे नांव पुढे आले आहे.