Maharashtra

उदयनराजेंविषयी बोलण्याची माझी लायकी नाही – रामराजे नाईक निंबाळकर

By PCB Author

September 14, 2019

सातारा, दि. १४ (पीसीबी) – खासदार उदयनराजेंविषयी बोलण्याची माझी लायकी नाही. मात्र, राजे काहीही करू शकतात. ते आऊट ऑफ द पार्टी पॉलिशिटीशियन आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!, अशा शब्दांत फलटणचे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार  उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज (शनिवारी)  आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावर रामराजे  यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीमध्ये असताना रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यांचे वैर जगजाहीर आहे. आता  उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला  आहे. आणि रामराजे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांनी  महामेळावा घेऊन  कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराच्या बातम्या येत आहेत,  त्यामुळे काही कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. त्यासाठीच हा मेळावा आपण घेतला असल्याचे त्यांनी म्हटले होते.