उदयनराजेंचा पक्षप्रवेश करताना भाजपकडून ‘छत्रपती’उपाधीचा अवमान – रोहित पवार

0
633

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा शनिवारी नवी दिल्लीत भाजप झाला. यानंतर उद्यनराजे यांच्यावर राष्ट्रवादीतून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भाजपवर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे.

एका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये उदयनराजेंचा पक्षप्रवेश करत ‘छत्रपती’ या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

उद्यनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम  मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात येते, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायचे आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो, तसाच आपणही तो मान ठेवावा.