उदयनराजेंचं भाजपमध्ये स्वागत असेल – शिंवेंद्रसिंहराजे

0
377

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी दुजोरा देत उदयनराजेंचे भाजपमध्ये स्वागत असेल असे म्हटले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी काहीच आठवड्यांपुर्वी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात कॉंग्रेसने सत्ता गाजवली आहे. पूढे शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेससोबत आघाडी केली आणि सत्तेची फळे चाखली. गेले अनेक वर्षे देशात सत्ता गाजवणारी आघाडी आता पूर्णपणे मोडकळीस आली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळीचे पक्षांतराचे चित्र विधानसभेच्या तोंडावर अधिकच गडद होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपाच्या साथीला जात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.