Notifications

उत्तर भारतीय ओबीसी समाजाला महाराष्ट्रात आरक्षण हवे – संजय निरुपम

By PCB Author

September 18, 2018

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – उत्तर भारतीय ओबीसी समाज आणि अनुसूचित जाती–जमातींमधील प्रमुख जातींना आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संजय निरुपम यांच्यासह एक प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेटले त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या भेटीनंतर निरुपम आगे बढो च्या घोषणाही देण्यात आल्या.