उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

0
517

बुलंदशहर, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. बुलंदशहर येथे सुरु असलेल्या तपासणी दरम्यान पोलिसांनी सोमवारी (दि.१५) रात्री मोठ्या प्रमाणावर दारु आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बुलंदशहर जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून नियमितपणे तपासणी होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री बुलंदशहर येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना जप्त केला. यामध्ये ४०५ अवैध हत्यार, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्रासाठा हा मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस अधीक्षक एन. कोलांची यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस अधिक तपास करत आहेत.