उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींचा मुलगा रोहित शेखर तिवारीचा संशयास्पद मृत्यू  

0
567

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) –  उत्तर प्रदेश  माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा संशयास्पद मृत्यू  आज (मंगळवार) संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झाला.  त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

त्यांच्या हृदयाची क्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आज संध्याकाळी त्यांना  दिल्लीच्या साकेत मॅक्स रुग्णालयात  दाखल करण्यात आले.  मात्र,  डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रोहित शेखर दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये राहत होता. आई आणि पत्नीने त्याला साकेत रुग्णालयात घेऊन आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिल्ली दक्षिणचे पोलिस उपायुक्त विजय कुमार यांनी ही माहिती दिली.