Desh

“उठो बिहारी करो तैयारी, जनता का शासन अबकी बारी”, ‘या’ नेत्याने केली घोषणा

By PCB Author

September 26, 2020

बिहार,दि.२६(पीसीबी) : बिहार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत एक घोषणा केली आहे कि,या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.” बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येथील राजकीय वातावरण आता अधिकच तापत असल्याचे दिसत आहे. बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून मागील वेळी २०१५ मध्ये सत्ता मिळवली होती. त्यात त्यांच्या पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या होत्या तर जनता दल ७१, भाजप ५३ तर काँग्रेस २७ जागा मिळाल्या होत्या.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर, करोनाच्या आपत्तीमुळे जग पूर्ण बदलून गेले असून, नव्या परिस्थितीत आयुष्यातील घडामोडींचा विचार करावा लागत आहे. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणूक ही जगभरातील मोठी निवडणूक असेल. लाखो विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा दिल्या आहेत. लोकांचे आरोग्य सांभाळून लोकप्रतिनिधींची निवडप्रक्रिया पार पाडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे.