उघड्या दरवाजावाटे पावणे दहा लाखांची चोरी

0
351

चिखली, दि. २९ (पीसीबी) – घराचा दरवाजा उघडा ठेऊन महिला दुस-या घराच्या बांधकामावर गेली. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरातून 9 लाख 70 हजारांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडली.
सुमित्रा अमसिध्द खोत (वय 46, रा. शिवतेजनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजता फिर्यादी सुमित्रा त्यांच्या घराचा दरवाजा उघडा ठेऊन त्यांच्या दुस-या घराच्या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून 165 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 9 लाख 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. साडेअकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.