Pune

उंड्री पिसोळी हे गावे देखील विकासाच्या मार्गावर – आमदार माधुरी मिसाळ

By PCB Author

January 15, 2020

पुणे, दि.१५ (पीसीबी) – पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात दूरदृष्टी ठेवून विकासकामे सुरु झाली आहेत. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

उंड्री पिसोळी हे गावे देखील विकासाच्या मार्गावर या गावांचा सुनियोजित विकास करू , असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. उंड्री गावामध्ये पालिकेच्या माध्यमातून नव्याने जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार माधुरी मिसाळ यांच्याहस्ते ब्रिक्स कॉलेज ऑफ आर्किटेकट येथे करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मिसाळ बोलत होत्या.

यावेळी नगरसेविका अश्विनी पोकळे , माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, उद्योगपती राजेंद्र भिंताडे, किशोर पोकळे, सुभाष घुले, ग्रामपंचायत सदस्या जयश्री पुणेकर, गौरी फुलावरे, शशिकांत पुणेकर, गणेश पुणेकर, ललिता कामठे, सुनील पुणेकर, दादा कड, प्रफुल कदम, तानाजी धनवडे, सोमनाथ आंबेकर, बबलू लोणकर, डॉ. खिलारे, जगदंबा हॉलचे मोहन, दशरथ व अश्विन ,  माया कामठे, रेणुका भिंताडे, आकाश टकले व उंड्री ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार राजेंद्र भिंताडे यांनी मानले.