Pimpri

“ई-पॉस मशीनवर 4-जी अद्यावत नेटवर्क सुरू करा”– माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी तसेच जुन्या झालेल्या मशीन्स नवीन बदलुन मिळणेबाबत

By PCB Author

October 22, 2020

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) –  रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना धान्य वितरित करत असताना ई पॉस मशीन द्वारे धान्य वितरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारद्वारे देण्यात आल्या आहेत. प्रत्.यक्षात या मशिनचा वापर करताना नेटवर्क मिळत नसल्याने खूप वेळ जातो, त्यावर पर्याय म्हणून ई- पॉस मशीनवर 4-जी अद्यावत नेटवर्क सुरू करा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांना त्याबद्दलचे निवेदन बाबर यांनी पाठविले आहे.

निवेदनात बाबार म्हणतात, यापूर्वी आम्ही केंद्र सरकार माननीय श्री राव साहेब , जी .डी. जी, एन आय सी, यांना 12 ऑक्टोबर 2020 रोजी याबाबत पत्रव्यवहार केला होता. आमचे नांदेडचे प्रतिनिधी अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी सरचिटणीस नांदेड जिल्हा यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. मशीनचे नेटवर्क खूप स्लो असल्याकारणाने नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. यामुळे नागरिक व दुकानदार यांच्यामध्ये शिवीगाळ तसेच हाणामारीचे प्रकार घडले जातात. मशीनला नेटवर्क दिलेले 2-जी आहे परंतु, आज आपला देश तंत्रज्ञाने संपन्न झालेला असून सर्व ठिकाणी आज पाहिले तर 4-जी चा वापर होतो. 2-जी च्या तुलनेत आपण जर विचार केला तर 4-जी चे नेटवर्क खूप फास्ट असल्यामुळे यापासून दुकानदारांना नागरिकांस धान्य वितरण करण्यासाठी याचा खूप फायदा होईल.

आत्ता वापरत असलेल्या ई पोस मशीन्स ह्या चार वर्षांपूर्वीच्या असल्याने त्यामध्ये बिघाड होण्याचाही प्रकार घडत आहे. यामुळे वारंवार नागरिकांमध्ये व दुकानदारांनामधे भांडण होणे असे प्रकार वाढत आहेत. सकाळी सकाळी दुकानदारांनी दुकान उघडल्यानंतर नेटवर्कच मिळत नसल्याने , तसेच वारंवार नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्याने नागरिक खूप संतप्त होतात व याचा त्रासही नागरिक व दुकानदार या दोघांनाही सोसावा लागतो. त्यामुळे नेटवर्क न मिळणे, नेटवर्क स्लो असणे ,मशीन बंद पडणे असे प्रकार महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी वारंवार घडत असल्याने आपण 2- जी चे नेटवर्क अद्यावत करून 4- जी करावे, तसेच दुकानदारांना नवीन मशीन देण्यात याव्यात त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी यु एस बी, कॉर्ड एक्सटेन्शन देण्यात यावे. त्यामुळे दुकानदारांचा कोरोना साथीच्या संसर्गापासून बचाव होईल, असे माजी खासदार बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.