ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित आघाडी सत्तेवर येईल – प्रकाश आंबेडकर

0
473

यवतमाळ, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत व त्याआधीही  मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या आहेत. त्यामुळे भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले. यावेळी ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी राज्यात सत्तेवर येईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

यवतमाळ येथे जाहीर सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘ईव्हीएम नसते, तर लोकसभेत आम्ही १२ जागांवर विजय मिळविला असता.  मात्र आता ईव्हीएम हॅकरच आपला व्यवसाय बुडण्याच्या भीतीने ईव्हीएम हॅक करणार नाही, असे ते म्हणाले. भाजप देशात चुकीचे चित्र रंगवत आहे.  लोकांना बदल पाहिजे असून सध्या बँका डुबण्याच्या अवस्थेत आहे, असेही  ते म्हणाले.

सरकारची तिजोरी रिकामी आहे. व्यापारी,  कारखानदार, कामगार सर्वच घटक सरकारमुळे त्रस्त आहेत. कापसाचे दर चार हजार क्विंटल दर जात नाही. या सर्वांमुळे जनता त्रस्त झाली असून, या निवडणुकीत आम्हीच खरे विरोधी पक्ष असल्याचे समोर येईल, असा विश्वास आंबेडकर  यांनी व्यक्त केला.