Maharashtra

ईडी कार्यालयासमोर गर्दी करू नका; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By PCB Author

September 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.२७) जात आहे.  तरी  कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

शरद पवार यांनी आपण शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर शरद पवार यांनी  पत्रकार परिषद घेत यांनी शुक्रवारी आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्विकारणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.