Maharashtra

ईडी, आयकर विभाग हे मोदी-शहांचे निष्ठावान कार्यकर्ते – राजू शेट्टी

By PCB Author

July 27, 2019

कोल्हापूर,  दि. २७ (पीसीबी) – ईडी  आणि आयकर विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टाकलेला छापा उपद्रव देण्यासाठी टाकला आहे. मुश्रीफ मंत्री असताना छापा का टाकला नाही? निवडणुकीच्या तोंडावर छापे टाकणे हे न उलगडणारे कोडे आहे, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

शेट्टी म्हणाले की,  आमदार मुश्रीफ यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिला आहे. त्यानंतर त्यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला. मुश्रीफ यांच्यावर टाकलेले छापे उपद्रव देण्यासाठी टाकले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर टाकलेले छापे हे न उलगडणारे कोडे आहे.  ईडी आणि आयकर विभाग केंद्र सरकारच्या तालावार नाचत असून मोदी, शहांचे दोन्ही विभाग निष्ठावान कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत.