Maharashtra

ईडीच्या नोटीशीला मनसे भीक घालत नाही 

By PCB Author

August 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. तुमच्या विरोधात बोलेल, तुमची प्रकरणे बाहेर काढेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल,  त्याच्याविरुद्ध दबावतंत्राचा वापर करायची भाजपची भूमिका आहे.  सीबीआय असेल किंवा ईडी असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या  नसून भाजपच्या  कार्यकर्त्या झाल्या आहेत, असा हल्ला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी चढवला.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना मनसे अशा नोटीशीला भीक घालत नाही, असे म्हटले आहे.    भाजप कार्यकर्त्यांशी कसे डील करायचे हे मनसेला चांगले माहित आहे.  त्यापद्धतीनेच आम्ही डील करु, असे इशारा  देशपांडे यांनी दिला आहे.