Maharashtra

ईडीचा आमचा काहीही संबंध नाही – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

August 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  चूक नसल्यास त्यांनी घाबरण्याची काय गरज? असा प्रतिसवाल करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीबाबत मीच अनभिज्ञ आहे,  अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) दिली आहे.

मुंबईमध्ये  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे.  यावर बोलताना  फडणवीस  म्हणाले की, राज यांना नोटीस आली असेल, तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, चूक नसल्यास त्यांना घाबरण्याची गरज काय? असे सांगून ईडीचा आमचा संबंध नाही. ती यंत्रणा स्वतंत्रपणे काम करते, असेही त्यांनी  स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी  येत्या २२ ऑगस्टला  ठाणे बंदचे आवाहन केले आहे.  मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत.  या दिवशी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन  मनसे कार्यकर्त्यांनी  केले आहे.