इस्त्राईल कोविड लसीकरण मोहिमेच्या शिखरावर

0
611

पिंपरी, दि. ८(पीसीबी). इस्त्राईलमध्ये सर्वात वेगाने लसीकरण सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या दोन महिन्यांत याठिकाणी 75 टक्के लोकसंख्येला लस देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण दुसरीकडे अमेरिका आणि फ्रान्ससारख्या मोठ्या देशात लसीकरणाचा कार्यक्रम जवळपास ठप्प झाला आहे. याठिकाणी पुरवठा साखळी, उत्पादन आणि भ्रष्टाचारात कोरोनावरील लस अडकली आहे. याठिकाणी लसीकरणाचा वेग खूप कमी आहे. तर भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये एक अब्जाहून अधिक लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे.

इस्राईलमध्ये फायझर बायोटेकची लस घेतल्यानंतर 12 हजार 400 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 1 लाख 89 हजार इस्त्राईलमधील रुग्णांना कोरोनाची लस दिली होती. त्यापैकी 6.6 % जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. १९ डिसेंबरपासून लसीकरण मोहिमेला इस्त्राईलमध्ये सुरुवात झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकांचं लसीकरण झालेलं आहे. सध्या इस्त्रायलमध्ये तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन सुरू आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर विविध देशांमध्ये कोरोनावरील लस शोधून काढली. लसीकरण सुरु झालं आहे. लसी किती प्रभावी ठरेल हे अजून जगासमोर आलेलं नाही. पण लस घेतल्यानंतर ही कोरोना झाल्याने या मोहिमेला धक्का बसण्याची शक्यता होती परंतु आता इस्त्राईलच्या कोविड लसीकरण मोहिमेच्या शिखरावर असल्याचं कळतंय..इस्राईलची लोकसंख्या 9 मिलियन आहे. त्यापैकी कोरोनाबाधित लोकांचा आकडा 372,401 आहे. तर 3,070 लोकांचा मृत्यू झाला आहे.