इलेक्ट्रिक डीपी मधून 65 हजारांच्या तांब्याच्या तारा चोरीला

0
440

चाकण, दि. २९ (पीसीबी) – चाकण परिसरात चोरट्यांकडून डीपी फोडून त्यातून तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. चाकण परिसरातील धामणे गावात आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी डीपीमधून 65 हजारांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत.
याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता विजय कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणे गावच्या हद्दीत असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीमधून अज्ञात चोरट्यांनी 65 हजारांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. तर 18 हजार रुपयांचे ऑईल सांडून त्याचे नुकसान केले आहे. हा प्रकार 18 सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून याबाबत 28 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात चोरटे इलेक्ट्रिक डीपीला टार्गेट करीत आहेत. एकांतात असलेल्या डीपीमधील ऑईल सांडून त्यातून तांब्याच्या तारा चोरून नेल्या जात आहेत. चोरलेल्या तांब्याच्या तारा चोरटे भंगारात विकत आहेत. त्यातून पैसे कमावण्याचा फंडा हे चोरटे वापरत आहेत. अद्याप पोलिसांना अशा एकाही टोळीचा सुगावा लागलेला नाही.