‘इलाके कुत्ते-बिल्लीके होते है, मोदीजी शेर है’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

0
648

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह आहेत. तर विरोधक कोल्हे आहेत, अशी   टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ‘इलाके कुत्ते-बिल्लीके होते है, मोदीजी शेर है’, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

मुंबईत सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी    मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.

मुख्यमंत्री म्हणाले की, ममता बॅनर्जी, शरद पवार, मुलायम सिंग हे एका भागातील नेते आहेत. दुसऱ्या भागात गेले तर यांच्या सभेसाठी कोणी येणार नाही. पण मोदी कुठेही सभेला गेले तर त्यांच्या सभेला लाखांची गर्दी होते.  जनावरे कितीही एकत्र आली, तरी ती सिंहाला पराभूत करू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री यावेळी  म्हणाले.