Maharashtra

इमारतीचा स्लॅब कोसळून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

By PCB Author

October 16, 2019

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – विरारमधील कोपरी नित्यानंद नगर भागात असलेल्या एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याने चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अचानक २५ ते ३० वर्षाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. या घटनेची अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. इमारतीत ३५ ते ४० लोक अडकले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.