Bhosari

इन्स्टाग्रामवर बोलत असल्याचे पतीला सांगण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार : चुलत दिराला अटक

By PCB Author

May 04, 2022

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – इन्स्टाग्रामवर माझ्याशी बोलते, हे मी तुझ्या पतीला सांगीन, अशी धमकी देऊन चुलत दिराने भावाच्या पत्नीवर बलात्कार केला. पोलिसांनी चुलत दिराला अटक केली आहे. हा प्रकार 30 एप्रिल रोजी मध्यरात्री मोशी येथे घडला.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय चुलत दिराला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलासोबत घरी झोपल्या असताना आरोपी चुलत दिराने मध्यरात्री दोन वाजता घरात जबरदस्तीने प्रवेश केला. ‘तू माझ्याशी इन्स्टाग्रामवर बोलते हे तुझ्या नव-याला सांगेन’ अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीवर आरोपीने बलात्कार केला. ‘याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला बघून घेईन अशी आरोपीने धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.