Pune Gramin

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी काजल गारोळे

By PCB Author

July 09, 2021

तळेगाव दाभाडे,दि.०९(पीसीबी) – इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे ही महिलांची आंतरराष्ट्रीय संस्था असून गेली २३ वर्षे कार्यरत आहे. समाजातील सुशिक्षित महिला आपल्या घरगुती, व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून, आपण ह्या समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेतून सामाजिक कार्यासाठी एकत्र येतात.

यंदाच्या वर्षी या संस्थेच्या अध्यक्षपदी काजल गारोळे ह्यांची निवड झाली आहे. काजल ह्या विज्ञान शाखेत पदवीधर असून, स्वतः चा बेकरी व्यवसाय सांभाळतात.करोना मुळे अडचणीत आलेल्या महिलांना मदत करण्याची त्यांची इच्छा आहे.