इथिओपियाच्या ‘झिके अटलाव डेबेबे’ने पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकली

0
585

पुणे, दि. २ (पीसीबी) – इथिओपियाचा झिके अटलाव डेबेबे  पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा विजेता ठरला. तर महिलांची ४२.१९५ किलोमीटर अंतराची शर्यत केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने जिंकली. सारसबागेजवळील सणस क्रीडांगणापासून या मॅरेथॉनला  आज (रविवारी) पहाटे पाच वाजता सुरूवात झाली. 

मॅरेथॉनमध्ये झिके अटलाव डेबेबेने २ तास १७ मिनिटे व १७ सेकंद वेळ नोंदविली. इथिओपियाच्या गतविजेत्या बेशा गेटाचेव याला यावेळी उपविजेतेपद मिळाले. बेशाने २ तास १८ मिनिटे व ०७ सेकंद वेळ नोंदविला. बेकेले अबेबा असेफा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने २ तास १८ मिनिटे व ३८ सेकंद वेळ नोंदविली.

महिलांच्या केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने २ तास ५० मिनिटे व २७ सेकंद वेळ नोंदवीत विजेतेपद पटकावले. त्यापाठोपाठ इथिओपियाच्या बेलेव असर मेकोनेनने २ तास ५२ मिनिटे व ३० सेकंद वेळ नोंदवीत दुसरा क्रमांक मिळविला. इथिओपियाचीच फेकेडे सिमेन तिलाहूनने तिसरा क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत एकूण १५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तर १०२ परदेशी स्पर्धक सहभागी झाले होते. विविध अंतरासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मुख्य मॅरेथॉन ४२ कि.मी., हाफ मॅरेथॉन २१ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी., व्हीलचेअर अशा विविध अंतरगटांचा समावेश करण्यात आला होता.