Maharashtra

इतके निर्दयी होऊ नका, कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नका; रिलेशनशीपच्या अफवांवर नेहा कक्करचे स्पष्टीकरण

By PCB Author

August 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी)- बॉलिवूडमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. काही दिवसांपूर्वीच नेहाचा ब्रेकअप झाल्यामुळे ती चर्चेत होती. आता पुन्हा एकादा नेहा इंडियन आयडल १० चा स्पर्धक विभोर पराशरसह रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नेहाने या सर्व चर्चांवर वक्तव्य करत चर्चांना पूर्ण विराम लावला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या संबंधीत स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ठिक नसल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान तिने कृपा करुन मला त्रास देणे बंद करा अशी विनंतीदेखील केली आहे. ‘ही पोस्ट लिहिताना मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ठिक नाही. तरीही मी ही पोस्ट लिहीत आहे. मी कुणाची मुलगी आणि बहिण आहे याची थोडी तरी जाणीव ठेवा. माझ्या कुटुंबीयांना माझा अभिमान वाटावा म्हणून मी फार मेहनत घेतली आहे’ असे नेहाने पोस्टमध्ये लिहिले आहे.

‘एखादी अफवा पसरवताना त्या अफवांचा कोणाच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार न करता लोक अफवा का पसरवतात. एखादा सेलिब्रिटी हा देखील एक माणूसच आहे. इतके निर्दयी होऊ नका. कुणाच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलू नका. या अशा अफवांमुळेच नैराश्याला बळी पडावे लागते. तुम्ही देखील कोणाचे वडिल किंवा भाऊ आहात. तुम्ही तुमच्या मुलीसोबत असे कराल का?’ असे नेहाने पोस्टमध्ये लिहिले आहे.