इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही – राज ठाकरे

0
363

सोलापूर, दि. १६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या दुकलीच्या हालचाली रशियाच्या धर्तीवर सुरू आहेत. ते दोघे देशाला मोडीत काढत आहेत. ज्यांच्यावर मी विश्वास टाकला होता, त्या मोदींनीच केसाने गळा कापला. इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही,’ अशा शेलक्या शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. सोमवारी सायंकाळी सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. अच्छे दिन आणि विकासाच्या गप्पा मारणारे मोदी आणि शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून गेली पाहिजेत. या दोघांबद्धल माझ्या मनात प्रचंड राग असल्यानेच मी माझ्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीत उभा नसताना प्रचारात उतरलो आहे. मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलो नाही. मोदी-शहा या जोडगोळीला हटविण्यासाठी मोदींना मदत होईल, अशा कोणाला ही मतदान करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.