Desh

इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद; २४ तासांत ६२७ जणांचा मृत्यू

By PCB Author

March 21, 2020

देश,दि.२१(पीसीबी) – इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत इटलीत ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५९८६ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, इटलीत एकाच दिवसांत ५९८६ नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार २१ इतकी झाली आहे. तर मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.