Maharashtra

इचलकरंजी नगरपरिषदेच्या दोन नगरसेवक भावांसह १८ जणांवर मोका; एका वकीलाचा समावेश

By PCB Author

May 20, 2019

कोल्हापुर, दि. २० (पीसीबी) – इचलकरंजी नगरपरिषदेचे ताराराणी आघाडीचा नगरसेवक संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ, नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्या ‘एसटी’गँग या टोळीविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये तेलनाडे भावांशिवाय वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांचा समावेश आहे.

संजय तेलनाडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख मटका बुकी आहे.  ‘एस.टी.’ गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे. मटका, हाणामारी, दहशत पसरवणे, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे या टोळीविरोधात दाखल आहेत. या टोळीविरोधातील ‘मोक्का’ कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधुसह अन्य आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली.