Maharashtra

“इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या”

By PCB Author

March 13, 2020

मुंबई,दि.१३(पीसीबी) – इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जसा भाजपप्रवेश केला तसा महाराष्ट्रात देखील कुणीतरी ज्योतिरादित्य तयार होईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवारांनी टोलेबाजी केली.

मी लपून छपून काही करत नाही… तिथंही गेलो अन् इथंही मजबुतीत बसलो. इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या. आज बरेच जण गैरहजर आहेत, असं अजित पवार म्हणाले. तसेच राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल असं म्हणत पुढची पाच वर्ष तिथं काढलीत तरी चालतील… असं सांगतच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील, असंही ते म्हणाले.